Ad will apear here
Next
भारतातील शेअर बाजाराची ओळख
छोट्या गुंतवणुकीतून जास्त नफा शेअर बाजारातून मिळतो; पण यात धोकेही अनेक असतात. कधी एकदम उसळी मारणारा हा बाजार कधी नीचांकी पातळीही गाठतो. शेअर बाजाराच्या तोट्यातून वाचण्यासाठी योग्य वेळी योग शेअर खरेदी विक्री करून भरपूर पैसा मिळवण्यासाठी जितेंद्र गाला यांनी ‘भारतातील शेअर बाजाराची ओळख’मधून मार्गदर्शन केले आहे.

गुंतवणुकीचे नियोजन, त्याचे पर्याय, सिक्युरिटीज, प्राथमिक शेअर बाजार, ‘आयपीओ’, धोक्याचे मोजमाप, दुय्यम शेअर बाजार, शेअर बाजारात उतरण्यासाठी आवश्यक गोष्टी, गुंतवणुकीचे फायदे, गुंतवणुकीतून नफा कसा मिळवायचा, शेअर बाजारावर परिणाम करणारे घटक, म्युच्युअल फंड, कमॉडिटीज, भांडवलदारांसाठी नियम, त्यांच्या अडचणी, उपाय, त्यांचे हक्क, गुंतवणूकदारांचा तोटा कशामुळे होतो, त्यांची घ्यावयाची काळजी, शेअर बाजारासंबंधी माहिती मिळवण्याचे मार्ग, भांडवलदाराला दिलेले हक्क, सेन्सेक्सची ऐतिहासिक घटना, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्या, बाजारासंबंधी मराठी-इंग्रजी शब्दकोश आदी माहिती यात दिल्याने नव्या-जुन्या गुंतवणूकदारांबरोबरच, सामान्यांनाही शेअर बाजाराबाबत ज्ञान मिळते.                 

पुस्तक : भारतातील शेअर बाजाराची ओळख
लेखक : जितेंद्र गाला
प्रकाशक : बजिंग स्टॉक पब्लिशिंग हाउस
पाने : १७६
किंमत : २२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZMZBV
Similar Posts
इंट्राडे ट्रेडिंगची ओळख हल्ली शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणुकीकडे कल वाढू लागला आहे. डे ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. डे ट्रेडिंग म्हणजे नेमके काय याची कल्पना गुंतवणुकदारांना यावी यासाठी जितेंद्र गाला आणि अंकित गाला यांनी ‘इंट्राडे ट्रेडिंगची ओळख’मधून सर्व माहिती दिली आहे. सिक्युरिटी मार्केटची
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
३१ स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. यात धोका असला, तरी योग्य अभ्यास आणि सल्ला यामुळे ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते; पण अनेक गुंतवणूकदारांना व ट्रेडरना शेअर बाजारात योग्य सल्ला न मिळाल्याने त्यांचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी रवी पटेल यांनी ‘३१ स्टॉक मार्केट ट्रेडिंग टिप्स’मधून टीपा दिल्या आहेत
तुमच्या यशाची गुरुकिल्ली बऱ्याचदा दुसऱ्याच्या अनुभवावरून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. एन. भट्टाचार्य यांनी या पुस्तकात, तर आपल्यासमोर थॉमस एडिसन, धीरूभाई अंबानी, वॉल्ट डिस्नी अशा थोरांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांची वाटचाल, परिश्रम यांविषयी सांगितले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language